कोरडी

माझे सर्व तुला देवून मी रिता रिता झालोय,
दुःख एवढेच कि तुझ्यापर्यंत ते पोहोचलेच नाही कधी,
तु कोरडीच राहिलीस शेवटपर्यंत.

मी तुझ्यावर प्रीतीचा पाउस होऊन बरसलो
माझ्या शेवटच्या थेंबापर्यंत,
पण तु त्यात भिजलीच नाहीस कधी,
मी मात्र
माझे सर्व तुला देवून मी रिता रिता झालोय...