छंद

कधी तू शांत नदी,
कधी खळखळणारा झरा,
कधी मंद झुळुक तर
कधी सुसाट वारा,
रोज नवी रुपे तुझी
रोज नवे ढंग,
तुला पाहात जगणे आता
हाच माझा छंद...