स्मरण

कितीही पाहिल तरी मनभरून पाहायच राहुनच गेल,
कितीही जगलो तरी थोडस जगायच राहुनच गेल,
आज तु दिसलीस अन मन उदास व्हायच विसरून गेल,
आनंदाच्या डोहात डुंबतांना गर्दीत मिसळायच राहुनच गेल.

मला वाटल फक्त मीच तुला शोधतोय,
पण तुझीही नजर मलाच शोधत भिरभिरत होती,
नकळत नजरा-नजर होताच
तु परत-परत मान वळवत होतीस.

शैवटी एकदाचे मला ते ओळखीचे हसू दिसले,
आणि रुसून बसलेले माझे मन खुशीत येवून गालात हसले.

पण निरोपाची वेळ आलिच शेवटी,
हसरे चेहरे झाले दुःखी कष्टी,
उचलता उचलेना आता
ही पावलेही झाली हट्टी.

पण हाच जीवनाचा नियम आहे,
प्रत्येक शेवट ही कसली तरी नवीन सुरुवात आहे,
म्हणून मनभरून कोणालाच पाहायचे नसते,
आठवणींच्या हिंदोळ्यात त्या चेहऱ्याला स्मरायचे असते...