हुरहुर

एरव्ही सर्व ठिकच आहे तुझ्या नसन्याने,
आणि तुझ्या असण्यानेही कधी ते चांगले होते?
तेव्हा हसतांनाही सराव लागायचा,
आता मी रडतोही मनभरून,
पुर्वी चालता चालता पावल थिजायची,
कधी बोलता बोलता पापणी भिजायची,
मग माणसांत जायला भीती वाटायची,
खिडकीबाहेरची दुनिया नको वाटायची...
म्हणून मिटून घेतली दारे घट्ट,
नशिबी आला काळोख किट्ट...
पण एके दिवशी एक चुकार पाखरू घरात शिरल,
अन पुन्हा माझ नशिब फिरल,
पाखराला हाकलायला खिडकीच दार खोलल,
अन ताजा वारा मनात भिनला..

मग तोडून टाकले पाश सारे,
उर भरून घेतले वारे,
केली पुन्हा मनाची तयारी,
अन घेतली मी उंच भरारी,
बंद केलय मनात कुढन,
आता फक्त उंचच उडण,
तरीही मन अजून हुरहुरतय,
तुझ्याच घरावर वेड भिरभिरतय...