कस जमत तुला हे कशातच नसतांना सगळीकडे असण,
पुर्णपणे सरण आणि तरीही मागे उरण..?
तु कधीच माझा जगण्याचे कारण नव्हतीस,
पण माझ्या न मरण्याचे कारण तुच होतीस,
कस जमत तुला अस सरुनही मागे उरण?
अशीच उरली आहेस अजुनही तु माझ्यामध्ये,
पहाटे पहाटे उशाशी भेटतात मजला
तुझ्या गजऱ्यातील बावलेली फुले,
तुझ्या गाण्यांवर झुलतात बाहेर
अजुनही माझ्या अंगणातील झुले,
अजुनही कानांत वाजतात तुझे खुळे पैंजण,
संध्याकाळी तुळशी समोर तुच तर लावतेस निरांजन,
रात्री उशीरा आल्यावर तुच उघडतेस दार,
तुच विणतेस सकाळी अंगणातील फुलांचा हार,
दिवाळीला शालू नेसून तुच लावतेस पहिला दिवा,
तुझ्याच हसण्याणे भेटतो मला रोज एक दिवस नवा,
म्हणुनच एक सांग
कस जमत तुला अस सरुनही मागे उरण?
पण आताशा मन तुझ्या असण्यापेक्षा
तुझ्या नसण्यातच जास्त रमत,
मग कधीतरी तु भेटल्यावर मला
तटस्थ राहण जमत,
तु विचारतेस "कसा आहेस, मजेत ना? "
मी म्हणतो "अगदी मजेत, ती आहे खुपच छान"
माझ्या ह्या थापेला एक माणुस फसत,
'कस फसवल' म्हणत माझेही मन गालात हसत...