विधानसभा व लोकसभा निवडणुका एकदम

१९६७ पर्यंत विधानसभा व लोकसभा निवडणुका एकाच वर्षी होत होत्या. नंतर, सरकारे मुदत पूर्ण करण्याच्या आधीच पडू लागल्याने हा समन्वय तुटला. लोकसभा निवडणूक झाल्यावर वर्षाने लगेच विधानसभा निवडणूक असे होऊ लागले. उलटही घडू लागले. यामुळे केंद्रात एका पक्षाचे सरकार तर राज्यात निराळ्या पक्षाचे सरकार असे होऊ लागले. दोन निवडणुकांत अंतर पडल्याने लाटा वेगवेगळ्या होऊ लागल्या.

  • कायदा करुन दोन्ही निवडणुका एकाच वर्षी आपापसात कमी अंतर ठेवून घेता येतील का? तसे करावे का ?
  • कमी अंतराने निवडणुका झाल्याने राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार येण्याची शक्यता वाढेल का ?
  • एकाच पक्षाचे सरकार सर्वत्र असल्याने धोरणांमध्ये सुसूत्रता येईल का ?