चाचपडतोय अजूनही आम्ही अंधाराच्या युगात
चिमण्याच दिसता सगळ्या जेंव्हा,दिसेल कुठे जळणारी वात.
कसला कसला बाजार ह्या मायेच्या बाजारी
मायाच माया सगळीकडे मायेसाठीच की चोरी
आसुसलेलं पोट वणवण फिरी अन्नाच्या शोधात
धर्म सुद्धा विकला जातो की आजच्या जगात
जिथे तिथे ढोंग कपाळी जगण्यासाठी माणसाच्या
फरक असा कुठला पडला माणसाच्या वागण्याचा
समोरा समोर भेटून आम्ही आज हि खोटेच हसतो
हाच माझा सखा म्हणत आम्ही बाकी सारेच फसतो
खरं खरं वागतात म्हणे मनासारखी जगातील त्या भुते
स्वतः साठी जगणं आता सोडलंय म्हणा ना आम्ही इथे