अजून काय हवं

मुसळधार पाउस, गरम भजी

वाफाळलेली कॉफी, अन तुझी कुशी

अजून काय हवं मजेत जगायला

चार मित्र, दोनच गाड्या

शेअर्ड पेट्रोल अन राजगडाचा माथा...

अजून काय हवं मजेत जगायला

मिळालेले पदक, आईचं वर्णन

बाबांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव

अजून काय हवं मजेत जगायला