त्रिकालाबाधित सत्य

           केवळ आपल्या बायकोबरोबरच नव्हे(याबाबतीत समस्त नवरे मंडळींचे एकमत असतेच) तर कोणत्याही स्त्रीबरोबर वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर खालील गोष्टीतला अनुभव येऊन पस्तावाल.
एके दिवस पतिराज बराच वेळ मासे पकडण्यासाठी गेले आणि मध्येच कंटाळा आल्यामुळे  घरी जाऊन एक डुलकी काढावी या उद्देशाने घरी आले. जरी त्या तलावाची माहिती नव्हती तरी त्याच्या पत्नीस त्याने नेलेली सर्व सामग्री पाहून उत्साह आला आणि ती बोट तशीच घेऊन तलावात थोड्या अंतरावर जाऊन ती पुस्तक वाचत बसली. तेवढ्यात त्या तलावातील अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणारा गृहरक्षक तेथे आला आणि त्या महिलेस अभिवादन करून त्याने विचारले,
"माफ करा बाईसाहेब आपण काय करत आहात? "
त्या स्रीला या पृच्छेचे मोठे आश्चर्य वाटले "पुस्तक वाचत आहे " दिसत नाही का (मनातल्या मनात)?
"आपण मासेमारीपासून संरक्षित क्षेत्रात आहात बाईसाहेब"त्याने तिला माहिती देण्याच्या उद्देशाने म्हटले.
"हो पण अधिकारीमहाशय मी पुस्तक वाचत आहे. "
"खर आहे पण तुमच्याकडे सगळी मासेमारीची सामग्री आहे, आणि त्यामुळे तुम्ही केव्हांही मासे पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला तुम्हाला अटक करावी लागेल व तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल"
"पुस्तक वाचत असल्याबद्दल? "महिलेने उलट विचारणा केली
"माफ करा बाईसाहेब पण आपण संरक्षित क्षेत्रात आहात. " अधिकारी
" अधिकारीमहाशय पण मी पुस्तक वाचते आहे मासे पकडत नाही हे आपण पाहतच आहात"
"ते खरे आहे पण त्यासाठी लागणारे सगळे साहित्य तुमच्यापाशी आहे आणि त्यामुळे आपण केव्हांही मासे पकडू शकता, त्यामुळे मला माझे कर्तव्य म्हणून आपल्यावर गुन्हा दाखल करावा लागेल"
"अच्छा तर मग मला तुमच्यावर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल करावा लागेल" ती महिला संतापाने त्याला म्हणाली.
अधिकारी अगदी गडबडून जात म्हणाला, "असे कसे बाईसाहेब मी तर आपल्याला हातही लावला नाही. "
’खरे आहे पण त्यासाठी लागणारी सगळी सामग्री तुमच्याकडे आहे आणि तुम्ही कोणत्याही क्षणी तसे करू शकता. "
"माफ करा बाईसाहेब, आपला दिवस चांगला जावो"म्हणत अधिकाऱ्याने तेथून पलायन केले.
तात्पर्य
उगीचच कोणत्याही स्त्रीशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका महागात पडेल.
मला आवडलेल्या एका विरोपाचे भाषांतर