कोणत्या मापात मी पेला भरू?

आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू

कोणत्या मापात मी पेला भरू?
आमचे होईल मग फुलपाखरू

आमची होणार वाताहत अता
लागली दारू जशी ही ओसरू

रोज मी तेव्हाच गुत्ता सोडतो
लागता ती बारबाला आवरू

सोडती घरला बरोबर सोबती
लागते अमुचे जसे माथे फिरू

लडखडाया लागला पाया किती!
बिल भरू ? की हा अधी गल्ला धरू ?

प्यायली इतकी अता मग मी कसे
प्यायलो नक्की किती पेले स्मरू?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे बाटली
ही उद्या पाण्यास आता वापरू

पेग भरण्या वेळ दवडाया नको
बाटली उघडू, तिचे पेले करू

बायकोने  नेत्र आहे रोखले
(सांग मी पुढचा कसा पेला भरू?)

ही विदेशी आणि देशी  हातभट्टी
बोल "केश्या" ही भरू की ती भरू

१. देशी किंवा विदेशी मदिरेत बेवड्याला जेव्हा झिंगायचे असते (चार किंवा त्यापेक्षा जास्त पेग) , तेव्हा त्या पेगाच्या वर किंवा मध्ये किंवा दोन क्वार्टरच्या नंतर तिथे  हाफ़ असे मोजून पुढील पेये  ही एकत्रितपणे ओतावीत, असा बेवडांचा निर्देश असतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ दोन वस्तू मिसळणे असाही आहे.   (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )