मराठा मटण खिमा

  • मटण खीमा १ कीलो
  • कांदा लसुण मसाला २ ते ३ चमचे.
  • गरम पाणी आश्यकते नुसार
  • १ टोमेटो आवड्त असल्यास कापलेला
  • १ मोठा कांदा स्लाईस करुन (उभा कापलेला)
  • अजुन एक छोटा कांदा बारिक चिरलेला.
  • तिखट चवीनुसार
  • पुदिना व कोथिंबीर चिरलेली सजावटि साठी.
  • तेल आवश्यक्ते नुसार.
४५ मिनिटे

    वाटणासाठी साहित्य:

    • सुके खोब्रे वाटी १ (जाळावर काळी भाजुन गार झाल्यावर किसून घ्यावी.)
    • आलं १ इंच 
    • लसूणीच्या १५ ते २० पाकळ्या.
    • हळद अर्धा चमचा
    • कोथिंबिर थोडीशी
    • लवंग ४
    • दालचीनी २
    • हिरवी वेलची ४
    • शहाजिरे १ चमचा.
    • मिठ चविनुसार
    साहित्यः

    1. खिमा स्वच्छ धुवुन बाजुला ठेवा.


    2. भाजलेले सुके खोब्रे किस + आलं + लसुण + हळद + कोथिंबिर+ लवंग + दालचीनी + हिरवी वेलची सालासकट + शहाजिरे + मिठ सगळ मिक्सर किंवा पाट्यावर 
      वाटून घ्या बारीक.


    3. जाड बुडाच्या कडईत नाही तर नोनस्टिक भांड्यात तेल गरम करुन घ्या.


    4. गरम तेलात स्लाईस केलेला कांदा लालसर परतून घ्या.


    5. आता तयार वाटण यात जरा वेळ परतुन घ्या. जास्त वेळ भाजु नका खोब्रे आपण भाजुन घेतले आहे जाळावर याचे भान असु द्या.


    6. आता खिमा टाकुन मस्त परता.


    7. त्यात कांदा लसुण मसाला टाकुन जरास परता.


    8. खिमा बुडेल इतपत साधारण गरम पाणी घालुन पाण्याला उकळी आली की मंद विस्तवावर खिमा शिजवा.


    9. दुसरे पॅन मधे तेल गरम करुन त्यात १ एकदम बारिक चिरलेला कांदा तांबुस रंगावर परता.


    10. त्यात तिखट कोथिंबिर व आवड्त असल्यास टोमेटो ची फ़ोडणी करुन लगेचच तयार खिम्यावर ओता.


    11. मंद जाळावर खिमा तेल वरती तरंगे पर्यंत शिजवा. 


    वरुन कोथिंबिर पुदीना घालुन सोबत लिंबाची फ़ोड ठेऊन चपाती, नान, ब्रेड, भाता बरोबर सर्व्ह करा.

                        खिमा मधे तुम्ही मटार घाउन 'खिमा मटरहि' बनवु शकता.
                        माझि माय.....आई