अज्ञाताचा आरंभ...
प्रथम तुझ्या मनात की माझ्या मनात?
मैथुनाची अभिलाषा
प्रथम तुझ्या मनात की माझ्या मनात?
बिघडलेल्या गोष्टीचा शेवट सुचतोय्
पण तो आधी तुझ्या मनात की माझ्या मनात?
गोड गोड शक्यतांचे आडाखे
आधी माझं मन बांधतं की तुझं मन बांधतं?
ओळखीच्या गाण्याच्या लकेरीने अगदी तळातले सूर पेटतायत
पण ते आधी तुझ्या मनात की माझ्या मनात?
पावसाचे थेंब... प्रत्येक थेंबाची एकेक गोष्ट...
पण पावसाची सुरुवात? प्रथम तुझ्या मनात की माझ्या मनात?