शक्य नाही

तुला मी भेटणे ही शक्य नाही
असे मी राहणे ही शक्य नाही

मनातिल स्वप्न माझे  व्यर्थ आहे
तिला मी पाहणे ही शक्य नाही

असा मी कायदा केला स्वतःशी
मला तो तोडणे ही शक्य नाही

कुणी मज ओळखावे वाटते पण
मला, मी वाचणे ही शक्य नाही

कुठे शोधू मला मी सापडेना
तिला मी मागणे ही शक्य नाही

कसे आहे पहा हे विश्व माझे
जरासे हासणे ही शक्य नाही

             ---स्नेहदर्शन