सखी

सखी

जर उमजलीच माझी प्रीत
शिकून घे प्रेमाची रीत
आठवणीने एकदा तरी वेळेवर ये
नसशील येणार तर निरोप तरी दे
किती पाहू वाट लागले पाय कापायला
तारुण्याचा बहर लागला सुकायला
रोज उघडुनी रोजनिशी
भिजवीतो मी ओली उशी
स्वप्नांनाही फितविलेस तू
गतजन्मिची सखिच ना तू?