आषाढ शुद्ध पौर्णिमेला, वंदावा सद्गुरू।
कृपाशिर्वाद तयाचा मिळता, भवसागर आपण सहज तरू॥
गुरुमाऊली आहे, ज्ञानाचा पर्वत सुमेरू।
तेजोमय बुद्धीयोगे, चिंता भ्रम लागी सरू॥
दुःखनिवारक जप तप, दाने जरी किती केली थोरू।
गुरुसंतोष होता मात्र, झोळी सुखाने लागे भरू॥
सकळ देवतां माजी श्रेष्ठ, माता पिता असती गुरू।
निष्काम सेवारुपी आपुले पुष्प, चरणकमळी त्यांच्या अर्पण आता करु॥