लाल भोपळ्याचे चवदार सूप

  • लाल भोपळा पाव किलो, २ चमचे साजुक तूप, २ चमचे मैदा, चवीपुरते मीठ, मिर्पूड, कोथींबीर सजावटीसाठी
३० मिनिटे
३ ते ४ जण

१) सर्वप्रथम भोपळ्याच्या फोडी करून त्या कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात.
२) शिजलेल्या फोडी मिक्स्रमधये वाटून घ्याव्यात. (साधारण डोश्याच्या पीठासारखी consistency असली पाहिजे. )
३) एका पातेल्यात २ चमचे तूप टाकावे. तूप पातळ झाल्यावर त्यामध्ये मैदा टाकावा. मैद्याच्या गुठळ्या होवू नयेत म्हणून थोडा वेळ परतत राहावे.
४) तयार भोपळ्याचे वाटण पातेल्यात टाकून डावेने पुन्हा ढवळून घ्यावे.
५) आता या सूपात चवीपुरते मीठ व मिर्पूड घालून पुन्हा एकदा ढवळून घ्यावे.
६) गरमागरम सूप कोथींबीरीने सजवून serve  करावे.

१) ज्याना भोपळा भाजीच्या स्वरुपात आवडत नाही त्यांच्यासाठी ही चांगली पाककृती आहे.
२) जर आपण मिर्पूड वापरली नाही तर हे सूप अगदी ६ महिन्याच्या बाळासाठीपण चांगले आहे. मैदा नको असेल तर तांदुळाचे पीठ वापरू शकता.
३) अश्याच प्रकारे दुधीभोपळा, कोबी, फ्लावर वगैरे भाज्यांची पण सूप्स करता येतील. खास करून पावसाळ्यासाठी हा चांगला मेन्यू आहे.