जागा हो रे भारतीय माणसा

जागा हो रे भारतीय मानसा

जागा हो रे भारतीय मानसा जागा हो
आज जर उठला नाहीस तर कधिच उठणार नाहीस म्हनून जागा हो.
दिडशे वर्ष इंग्रजानी राज्य केले तेव्हा सुद्धा तु झोपलास होता.
डोळे उघडे ठेवून तु फक्त बघत होता.
पोखरण अणुस्पोट घडवून तु तुझी ताकत जगाला केव्हाच दाखवून दिली आहेस.
पण आता अस्तित्वाची लढाई आहे.
जर तुला तुझ अस्तित्व जगात टिकवून ठेवायच असेल तर,
जागा हो रे भारतीय मानसा जागा हो.
आपले शेजारी केव्हाच जागे झाले आहेत.
तीन वेळा युद्धात हरून सुद्धा पाकिस्तान युद्धाची भाषा करतोय.
चीनची अधून मधून घुसखोरी सुरुच आहे.
आता एकदाची आरपारची लढाई करायची आहे तुला,
नुसची करायची नाही तर जिंकायची आहे तुला.
जगात एक महाशक्ती म्हनून उदयास यायच आहे तुला.
म्हनून जागा हो रे भारतीय मानसा जागा हो.
शुन्याचा शोध तुच तर लावलास,
शुन्यातून विश्वनिर्मिती करन्याची ताकत जगात फक्त तुझातच आहे.
जगाला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे.
तुच तुझ्या मातीतून अनेक हिरे जन्मला घातले,
त्यांचा आजही जगावर पगडा आहे.
पण तो काळ भुतकाळ होता,
किती वर्ष तु भुतकाळावर जगनार आहेस.
म्हनून जागा हो रे भारतीय मानसा जागा हो
                                     जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)