तुझ्याचमुळे
तुझ्याचमुळे
मी जीवनात आलो ग आई.
तुझ्याचमुळे रंगी बेरंगी आयुष्य अनुभवायला मिळाल.
तुझ्याचमुळे
माझ आयुष्य सुंदर झाल.
कसे फेडू तुझे उपकार ग आई
तुझ्याचमुळे माझ
आयुष्य फुलाप्रमाने सजवता आल.
तुझ्याचमुळे माझ्यात जगन्याची हिम्मत आली.
दुःखात
सुखात साथ नेहमी तुझीच होती.
तु आमच्या सुखासाथी नेहमी झटायची.
प्रसंगी
शेजारयाशी आमच्यासाथी भांडायची.
तुझ्या मुर्ती वानी या जगात खरच दुसर
कुनिच नाही ग.
तु दुःखाची चाहुल कधी आम्हाला कळू दिली नाहीस.
जीवनाचा
महासागर पोहून पार करत असताना ,
पदोपदी तुझी आठवन येते ग आई.
आई तुच
तर ती कारागीर होतीस जीने कुरुप दगडाला आकार देवून सुंदर मुर्ती घडवलीस .
तुझ्या
हातात तर जादुची कांडी असायची त्याने तु सगळ्यान्ना सुखी ठेवायचीस.
आज
मी आनंदी आणि सुखी आहे ते केवळ तुझ्याचमुळे ग आई.
तुझे उपकार मी सात
जन्म गेउन सुद्धा फेडू शकणार नाही.
जगात कुठल्याही कानाकोपरात तुझी आठवन
आल्याशिवाय मला राहनार नाहि.
आज जे माझ्या पदरी यश दिसतय ते फक्त
तुझ्याचमुळे ग आई.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)