जीव.....न्त !!

होताच भेट तुझी, श्वासही मंदावतो

बोलतात फक्त डोळे, अन जीव वेडावतो ॥

जाणीव या जीवाची, जाहली जरी तुलाही

डोळेच साद घाली, तो माझा प्रांत नाही ॥

रमले जरी म्हणावे, मन माझे हरलेले

चिंता याचीच आता, पुन्हा कसे परतावे ?

बदलूनी मार्ग सारे, अंती पुन्हा तिथेच

शंका दाट झाली..... कळले

अपुला अंतही इथेच !