रे माझ्या गळणार्‍या केसा...

आम्ही विशी गाठेस्तोवरच केस गळतीनं आम्हाला गाठलं. नक्की काय करायला हवं
ते ठरवे पर्यंत काही महिनेच गेले असतील पण आम्ही पार चाळिशील भिडलेलं,
बर्‍यापैकी टक्कल पडायला सुरुवात झालेलं शीर टोपीखाली ठेवून मिरवायला लागलो.

(होमिपथी,आयुर्वेदिक )उपचार ,उपास तापास्,भूत बाधा ,मानसोपचार केश-रंगकाम,
जिरेटोप चढवणं(weaving/bonding) असे सर्व उपचार करून, जाणार्‍या हरेक
केसासोबत आम्ही त्याच्या दहापट पैसे घालवून बसलो.
तर अशी ही आमच्या विविध मार्गानं केलेल्या प्रयत्नांची दिशा आणी दशा:-
१.महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाच्या मध्याला कुणा हितचिंतकानं हळू हळू
केस गळती लागल्याचं निदर्शनास आणलं.
२.काही दिवसातच डॉ सतीश वैष्णव ह्यांची केश समस्येवर "शर्तिया इलाज" सारखी
वाटणारी,होमिपथी वाली पेपरतील जाहिरात बघून तिक्डं डेरेदाखल.
३. तिथला फायदा दिसायला वेळ लागतोय म्हणल्यावर त्याच्यासोबतच सर्व
धार्मिक,दैविक,मांत्रिक असले paranatural उपाय सुरू.
४.दोन्-अडीच वर्षानंतरही सर्व पथ्ये पाळत असून सुद्धा उपयोग होत नाही
म्हटल्यावर,उपचार करणार दैवत आम्ही बदललं. पुण्यामध्ये "डॉ बात्रा" (हे ही
होमिपथिकच)ह्यांचं शिष्यत्व पत्करलं.
६.सुमारे तीन वर्षे सलग उपचार घेऊन काय उपयोग होत नाय म्हटल्यावर शहाणा
माणूस थांबला अस्ता.
आता आम्ही अतिशहाणे असल्यानं आयुर्वेदिक च्या मागं पडलो.
वर्षभर झाले,उपयोग फारसा नाही. आता अनुपम खेर, अमरिश पुरी,राकेश रोशन
ह्यांच्या लायनीत लागलोय.(पैशाच्या हिशोबानं असतो तर बरं झालं असतं
तिच्य्आय्ला.)
७.शेवटी weaving करून घेतलं.कुणा दुसर्‍याचेच केस दत्तक घेऊन ते आपलेच आहेत
असं मानलं.
पण हे सोंग काही दिवसाच्या वर वठवता आलं नाही.
८.आता hair transplant करण्याचा विचार आहे.(तेव्हढा एकच प्रकार राहिलाय,
म्हटलं cosmetic surgeon ला तरी का उपाशी ठेवावं, सगळ्यांना वाटत सुटलो आहोत
तर.)

मिळालेला बोध-
केस गळणं हे क्रियापद "गाळणीतून चहा गळणं" ह्यासारखं घ्यावं.गाळणीत चहा
घेऊन कुणाला फिरता येतं का? नाय ना, बस्स मग.
लागलेली गळती (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही.
"खल्वाटो निर्धनम् क्वचित्" ह्या उक्तीच्या आशेवर जिवंत राहावं> आज नाय
तर उद्या अंबानीच्या पप्पापेक्षाही अधिक पैका आपल्याला मिळेल,ह्यावर
विश्वास ठेवावा. नसेल तर.
डोक्याच्या शेतात केस गळू लागले,की चिंतांचं पीक येतं. निदान ते कमी
ठेवावं.
काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात,त्यापेक्षा
आपल्याला केस नाहीत ह्यातच समाधान मानावं.
शेवटी काहीही झालं तरी केस जाणं ही एक सिरिअस केस आहे.
टाळक्यावरून गेलेले केस बघताना अगदी आपल्या हातची केस दुसर्‍याच वकिलाकडे
गेल्याच्या दु:खापेक्षा हे दु:ख नक्किच मोठं आहे.
मेसचं खाऊन केस जातात हे ऐकून आता तोंडाला फेस आलाय.
"गळणारे केस"ह्या समस्येला कसे करावे face ह्या चिंतेत आम्ही अजूनही आहोत.
ह्या चितेनं अजून केस जाताहेत.
एकदा टक्कल पडलं की मग त्यावर काही उगवण्यापेक्षा घरच्या सपाट फरशीवर भरघोस
धान्य उगणं सोप्प आहे.

केसाला लागलेली गळती, खिशापर्यंत पोहोचू नये म्हणून (दिवसेंदिवस उजाड
दिसत जाणारं)थोडं डोकं वापरावं.
अधिक सविस्तर (जमलं तर उपचार, उपचार प्रकार, लागणारा खर्च आणी त्याचा उपयोग
ह्याबद्दल)लिहीनच wig वगैरे फिट करून आल्यावर.

(शुची वापरला आहे. पण तरीही लिखाणाला अनुरुप असे काही शब्द तसेच ठेवणं गरजेचं होतं. (जसं "नाही" च्या ऐवजी"नाय" वगैरे))