सोसूनी यातना जहाल,
दाविसी तू आम्हा जन्म
रडू ऐकताच आमुचे,
अनुभवी तू दुसरा जन्म ।
इवल्या चिमण्या जीवांना,
जीव लावते अपार
चुका जाहल्या जरी अनंत,
क्षमण्या तेही, मन आईचे उदार ।
जन्म जाहला तो धन्य,
जो आई 'म्हणूनी' जन्मला
क्षण एकही नसावा,
आई..... तुजविण तोही जगाया ।
आताशा कुठे उमगले, देव का भिकारी ?
आई कुणा म्हणू मी,
बोलता लागसे जिव्हारी ।