"महागाई"
आजच्या पेक्षा काल बरं होत बाई ।
काही केल्या कमी होत नाही महागाई॥ध्रु॥
काल रुपयाला मिळत होती जुडी ।
आज फक्त त्याची मिळते आहे काडी॥
पैशाला आज काही किंमतच राहिली नाही ॥ध्रु॥१॥
सरकारी दुकानात शिल्लक नाही धान्य।
रस्त्यात ते सडते हे सरकारालाही मान्य॥
गरीबाच्या तोंडी काहीच पडत नाही ॥ध्रु॥२॥
सारी जनता चरफडत मुकेच राहते ।
सरकारला बोल देऊन गप्प बसते॥
श्रीमंताच्या पिढ्या सतत वर जाई॥ध्रु॥३॥
जिकडे पाहावे तिकडे चालते चिरीमिरी ।
त्यामुळेच सगळीकडे पसरली काळाबाजारी ॥
साठेबाजांना सरकारचा मुळी धाक नाही॥ध्रु॥४॥
अनंत खोंडे.
२८\७\२०१०.