कूट १

वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति |
नद्यो घना मत्तगजा वनान्ताः प्रियाविहीनाः शिखिनः प्लवङ्गाः ||

हा श्लोक चित्रकाव्य या प्रकारात पण कूट प्रकारात येतो.
कूट हे असे की या श्लोकातील काय वैशिष्ट्यं आहे ते सांगणे.

संदर्भ रामायण - राम पावसाळ्याचे वर्णन करत आहे.

अर्थ

[पावसामुळे]
नद्या जोरात वाहत आहेत, मेघ पर्जन्य पडत आहेत, माजलेले हत्ती चीत्कार करत
आहेत, जंगले सुंदर दिसत आहेत, विरही लोक प्रियेचे चिंतन करत आहेत, मोर नाचत
आहेत व बेडूक मजेत आहेत.



(अर्थ पाहण्यासाठी मूषकाचा दर्शक वरील ओळींवर ओढून त्या ओळी निवडाव्या.)