पौर्णिमेच्या रात्रीच्या निमित्ताने

आज अचानक "कल चौदहवी की रात थी" आठवलं अन लगेच गुगललं. या गझलला गुलाम अली आणि जगजीतसिंग यांनी आपापल्या पद्धतीने (बहुदा वेगळ्या रागात ? ) गायले आहे. मला आश्चर्य हे वाटलं की ही गझल कुमार सानुनेही गायली आहे. अर्थातच तिला वेगळी चाल आहे.

इथे बघता येईल. जियाला (१९९८) या चित्रपटात हे गाणं आहे. चित्रपटाचं नावही ऐकल्यासारखं वाटत नाही, हा भाग वेगळा  

ही गझल गुलाम अलींनी आपल्या शैलीत गायली

तर जगजीतसिंग यांनी स्वतःच्या शैलीत

मला ही गझल जगजीत यांच्या आवाजत ऐकताना एखादे भजन ऐकल्यासारखे वाटते म्हटल्यावर बऱ्याच शिव्या ऐकाव्या लागल्या होत्या. असो . ज्याची त्याची आवड.

हिच गझल इंदौरला असताना "रात बाकी" ह्या रेडिओ मिर्चीच्या कार्यक्रमात ऐकली होती अन ती चाल खूपच मस्त वाटली होती, पण नंतर कधीच ऐकायला मिळाली नाही. मला आठवते की त्यावेळी ती गझल गुलाम अली यांनी गायलीय, असं आर. जे. म्हणाला होता. गूगललासुद्धा त्या चालीची गझल नाही मिळाली.

एक चंदन दास आणि जगजीत यांनी गायलेली गझल आहे, 'अपने होटो पर सजाना चाहता हूं.. "

मराठीत विशेषतः नाट्यसंगीतात अनेक पदं वेगवेगळ्या गायकांनी वेगवेगळ्या शैलीत गायली आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं 'घेई छंद मकरंद'. बहुदा याला द्रुत आणि विलंबित म्हणतात की काय (चुभुदेघे).

तसंच पं. भीमसेन जोशींच्या आवाजातले 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा' हे गाणे वेगळ्या चालीत (बहुदा) जयवंत कुळकर्णींनी गायले आहे. (चुभुदेघे).

अशी अजून काही गाणी आहेत का ?

गाणे ऐकणे यापलिकडे मला काहीही कळत नाही, त्यामुळे काही चुकले असेल तर कान धरतो.