आठवणीतील रात्र

तो कोसळणारा पाउस
ती पुनवेची रात्र,
ती निथळणारी झाडे
अन भिजलेली गात्र...

शांत पण मोहक
चांदण्यांची रात,
चंद्र भिजलेला रात्रीत
कि रात्र भिजलेली चांदण्यात...

असे किती प्रश्न माझ्या मनात...?
झाली होतीस तु चांदणी
नेसली होतिस काळी रात...

भिजलेली तु अन
मी ही तुझ्यात भिजलेला
माझ्यासह तो रस्ताही
थिजलेला...