स्पर्श

तेच ढग तोच पाउस

त्याच विजा त्याच सरी...

मी तीच तुही तोच

आणि तीच दोघांमधली दरी...

मग काय आज वेगळे झाले ?

मीच आजच्या पावसात वाहून गेले

सगळ तेच

पण तुझा स्पर्श नवा

आता वाटते रोज असा पाउस हवा

अन तोच तुझा स्पर्श व्हावा...