कोंब

म्हणतात "झाल गेल विसरून जाव
उद्याकडे बघून आज मध्ये जगाव... "
पण खरच जगता येत का अस नव रोज...?
मलाच का मग अशी कालचीच ओढ...?

अजुनही कधीतरी मन त्याच रस्त्याने फिरत
तीच वळणे तेच खड्डे पुन्हा तोच प्रवास करत...

मी तर माझ्या भुतकाळावरही मनापासून केलय प्रेम
जस जवळच माणुस गेल्यावर त्याची भिंतीवर लावावी फ्रेम...

एरव्ही आपण सार विसरून धावत असतोच आज - "उद्यामध्ये"
जस खुप पाउस पडल्यावर डोंगर लपतो काळ्या ढगांमध्ये...

असच धावता धावता कधी त्या फोटोवर नजर खिळते
आणि वेळही उलट्या पावलांनी मागे पळते...

मग क्षणांत संपतो सगळा दुवा
माझ्या जगण्याला फुटतो एक आशेचा कोंब नवा...