'' कैलास ''

''  कैलास ''
जखडू पाहे हर श्वास  मला
जीवन वाटे गळफास मला
का जपतो मी हर  क्षण आता?
सोडुन गेले दिन-मास मला
नावडले जे कधिच्या काळी
लागे त्याचाही ध्यास मला
जोखुन आता मम पाणी 'ते'
छळतील उद्या बिंदास मला
उपदेश दुज्यास विरक्तीचा
हर गोष्टीचा हव्यास मला
'' संयत्,शिक्षित नेते असतिल ''
छळतात कधीचे भास मला
लेखीच '' बड्यां''च्या ''आम'' जरी,
छोटे ओळखती '' खास '' मला
मी कोण कशाला पुसतो तू?
सगळे म्हणती '' कैलास '' मला.
-डॉ.कैलास गायकवाड.