एकदा तरी...........
एकदा तरी सगळ काही करून पाहव.
स्वार्थी लोकांच्या या दुनीयेत कधी वेड बनून राहाव.
एकदा तरी आयुष्यात प्रेम करून पाहव.
प्रेमाच्या त्या पावसात ओलंचींम्ब भिजून राहाव.
एकदा तरी पंतगासारख मुक्त विहराव.
एकदा तरी रातराणी सारख मंद बहराव.
एकदा तरी आयुष्यात जिंकता जिंकता हरून पाहव.
एकदा तरी दुसरयाच दु:ख घेवून जगून पाहव.
एकदा तरी मनातील विचारांना चांगली चाल सुचावी.
एकदा तरी मनातील विचारांची चांगली कविता व्हावी.
एकदा तरी मुक्त होवून बेभान जगाव.
स्वार्थी लोकांच्या या दुनियेत कधी वेडं बनून राहव.
एकदा तरी आयुष्यात सगळ काही मिळाव.
एकदा तरी आयुष्य सुखान न्हाहून निघाव.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)