जेंव्हा दुःखाने माझ्या मनांत
पहिला तंबू ठोकला होता,
तेंव्हा अश्रुंचा काफिला बरेच दिवस
माझ्या डोळ्यांत वस्तीला होता ...!
जेंव्हा पापण्यांनी दिवस रात्रींचा
हिशोब ठेवला नव्हता,
तेव्हां शरीराने मात्र काळाचा गर्भ
स्वतःवर पोसला होता ...!
जेव्हां वेदनेच्या इमारतीवर नव्या
घावांचा मजला चढत होता,
तेव्हां चौघांच्या खांद्यावर माझा देह
केव्हांच हलका झाला होता ...!