क्रांती
होवू दे क्रांती पुन्हा या देशात.
मरतात येथे शेकडो स्वाईन फ्ल्युच्या तडाख्यात.
येथील शेतकरी राब राब राबतो शेतात.
विद्यार्थी करतो अभ्यास कंदिलाच्या प्रकाशात.
नसते कधी येथे विज , पाणी चोवीस तास.
होवू दे क्रांती पुन्हा या देशात.
जनता हैरान आहे स्वाईन फ्ल्युच्या ज्वरात.
पुढारयाची मती गेली आहे नरकात.
शेतकरी आत्महत्या करतो भर चौकात.
येथे खून , बलात्कार होतात रोज दिवसात.
होवू दे क्रांती पुन्हा या देशात.
तरूण पीढी बर्बाद होतेय सिगारेटच्या धुरात.
तरूण पीढी विसरत चालली संस्कृती दारुच्या नशेत.
अन्नदाता राब राब राबतो शेतात.
तरीपण अन्नाचा कण नाही पडत त्याच्या पदरात.
होवू दे क्रांती पुन्हा या देशात.
जनता हैरान आहे महागाइच्या विळख्यात.
उपाशी झोपतात पंधरा कोटी लोक दररोज दीवसात.
तरुण पीढी गुरफट चालली अय्याशीच्या चैनीत.
मुलगा पाठवीतो आईवडीलांना आश्रमग्रुहात.
होवू दे क्रांती पुन्हा या देशात.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)