कविता करतांना....

कविता करतांना ...........

कविता करतांना कधी शब्दच जुळत नाही.
मनाला भारून जाईल असं कुणी मिळतच नाही.

खुप समजावं या वेड्या मनाला,
पण मन कधी मनाच एकतच नाही.
कविता करतांना कधी शब्दच जुळत नाही.

कुणावर खुप प्रेम करावं
पण असं प्रेमळ कुणीच मिळत नाही.
मैत्रीचा धागा प्रत्येकाला बांधावा,
असा मित्रच मिळत नाही.

जीवनाचा महासागर पार करताना
कुणीतरी आपलं भेटावं नुसतं.
पाठीवर हात ठेवून लढ म्हणावं.
पण असं कुणी मिळतंच नाही.
कविता करतांना कधी शब्दच जुळत नाही.

गर्वाने गजबजलेल्या या जगात,
जो तो एकटाच चालत असतो.
रस्त्यात कुणीतरी वाटसरू मिळेल
या आशेने जगत असतो.
जगता जगता आयुष्य संपतं.
पण कुणी वाटसरू मिळत नाही.
कविता करतांना कधी शब्दच जुळत नाही.
मनाला भारून जाईल असं कुणी मिळत नाही.
                                        जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)