आयुष्याच समीकरण
फुलांप्रमाणे आपलं आयुष्य असतं.
पण जगताना एकटं वाटतं.
आयुष्याच्या डोंगरावरती उभ राहील की,
खुप उंच उंच भासतं.
समुद्रासारख अथांग आयुष्य
कधी कधी मुंगीप्रमाणे वाटंत.
आयुष्याला जिंकणं फार कठीण असतं.
आयुष्याचा आलेख जसा जसा उंच उंच जातो,
तसं तसं आयुष्य कमी कमी होत जातं.
आयुष्याला अनेक पाऊलवाटा असतातं.
त्याच प्रेमाची , मैत्रीच्या नात्याची समीकरणं घट्ट बांधली जातातं.
जसजसी आयुष्याची वाढ होते,
तसतशी झाडाच्या मुळांप्रमाणे
मैत्रीची बींज जमीनीत घट्ट रोवली जातातं.
खरंच आयुष्य म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी असतं.
आयुष्याच्या वाटयाला सुखः दुखाचा लपंडाव सुरू असतो.
तरी ते व्रुक्षाप्रमाणे अनेक संकटाचा
सामना करून ताठ मानेनं उभं असतं.
आयुष्य म्हणजेच सर्वकाही असतं.
फक्त जगणाऱ्यानंच ते अनुभवायच असतं.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)