अशीही काही नाती..
अशीही काही नाती असतात.
जी आपोआप जोडली जातातं.
फुलातील सुगंधाप्रमाणे दुरपर्यंत पसरली जातातं.
दुरवर राहुनसुद्धा मनात घर करून जातातं.
काही नाती मनातील भाव ओळखून जातातं.
तर काही नाती मनाला हादरून देतातं.
नात्याला जर भावनेचा स्पर्श झाला तर,
ती नाती खुलून दिसतातं.
नात्याला जर विरहाचा स्पर्श झाला तर,
ती दुःखाने व्याकुळ होवून जातातं.
काही नाती आपसांमध्ये आदर , प्रेम निर्माण करतातं.
काही नाती आपुलकी निर्माण करतातं.
अशीही काही नाती असतातं.
जी मैत्रीच्या बंधनाने बांधली जातातं.
काही नाती, प्रेमाच्या शब्दांनी आनंदून जातातं.
काही नाती फुलाच्या वर्षावाने भारावून जातात.
अशीही काही नाती असतातं.
जी कौतुकाने नाचायला लागतातं.
अशीही काही नाती असतात.
जी आपोआप जपली जातातं.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)