तुझ्यावाचुनी
तुझ्यावाचुनी मला करमेना.
कशातच मन लागेना.
नागमोडी वळणावर एकटाच भटकत फिरलो.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत राहीलो.
हसता हसता दुःखाचा सामना केला.
तु दिसल्यावर कोमजलेल्या बागेला बहार आला.
सागरांच्या लाटांसोबत पैज लावून जिंकलो.
पण तुझ्यासमोर हरणारा ठरलो.
सर्व जगाला जिंकन माझ्यासाठी कठिन नाही.
पण तुला जिंकन फार सोंप नाही.
जोपर्यंत जीवन आहे,तुझी आठवण येत राहील.
माझ्या एकाकी मनाला सदैव टोचत राहील.
हरणारा हरतो , जिंकणारा जिंकतो.
पण मी सर्व काही हरलो आहे.
ढगाच्या या आळोशात कुठेतरी तु अद्रुष्य झाली आहे.
जितेंद्र
गावंडे(९९२२४७६२५०)