या स्वार्थी जगात....

या स्वार्थी जगात.........

या स्वार्थी जगात
कुणीच कुणांच नसतं.
सगळीकडे भंटकंती करणारं मन आपलंच असतं.

कुणाला कधी हसवावं.
कुणाला कधी रडवाव.
असं कुणी मिळतंच नसतं.

या परक्या जगात
स्वतःच फक्त स्वत: शीच नातं असतं.
मनाला कीती समजाव,
पण मनाच आणि स्वतःच कधी नातंच जुळत नसतं.

या अंहकारी जगात
मनाला वळविणारं कुणीच नसतं.
स्वतासाठी जगाव , स्वतासाठी मराव.
हेच या जगाच समीकरण असतं.

या स्वार्थी जगात
कुनीतरी आपलही असतं.
चुकलेल्यावेळी ते शिक्षा करतं असतं.
दुःखाच्यावेळी ते धिर देत असतं.
खरंच या स्वार्थी जगात तेच खरं आपलं असतं.
                  जितेंद्र गावंडे(९९२२४७६२५०)