"हे परमेश्वरा"

"हे परमेश्वरा"

हे परमेश्वरा
तुझ्या क्रुपेचा प्रसाद सगळ्यांना मिळू दे !
तुझं अस्तित्व सगळ्यांना कळू दे!

दिवसाची सुरवात तर तुझ्याच नामस्मरणाने होते.
आयुष्याची सुरवात तर तुझ्याच आशीर्वादाने होते.

भरकटलेल्या वाटसरुला मार्ग दाखवीणारा तुच असतोस.
दुःखात सुखात साथ देनारा तुच असतोस.

हे परमेश्वरा
तुझ्याशिवाय हे जग..... ही कल्पना शक्यच नाही.
तुच तर या जगाचा विधाता आहे.
तुझ्या निर्माण केलेल्या पाऊलवाटांवर हे जग चालत आहे.

हे परमेश्वरा
तुझ्या मायेचा ओलावा आम्हाला मिळू दे!
भरकटलेल्या मनाला योग्य दिशा मिळू दे!

हे परमेश्वरा
तुझं अस्तित्व या जगात आहे
ते सगळ्यांना कळू दे!
तुझ्या दर्शणाने आम्हाला धन्य होऊ दे!
                  जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)