सूर्य अस्ताला गेल्यावर,
अंधाराच्या साम्राज्यांत
प्राणिमात्र विसावतात
आपापल्या खुराड्यात !
राउले होतात रीती,
अस्तित्व नाकारुन परमेशाचे.
तुझ्या लालदिव्याच्या माडीचा
आसमंत मात्र उजळतो लख्ख,
अन रस्ते ओसंडून वाहू लागतात
अंधाराचे साम्राज्य नाकारुन !
रात्र मंदावतान्ना,
अंधाराच्या साम्राज्यात,
तू घेतला असतो वसा.
अखंड सौभाग्यवतिचा,
रातराणीचा ,
अनुभवण्या बलात्कार हक्कांचे,
टिचभर पोटाच्या खळग्यासाठी !
असहाय्य वृद्ध मायबाप,
अन तान्हुल्याचा आक्रोश,
आदळत असतो कानावर,
करकरत्या खाटेवरच्या
कोंदट सम्भोगात ! ! !
निरंजन वहाळेकर