जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली

हझल:

 
माझ्या  नको त्या नासक्या  नादात  खाजच वाढली
त्या बेरक्यांनी  ऊडत्या  तालात लाजच काढली

(बांबूतली ती शीळ का कानात  गातच वाजली?
मी वाहताना  मोकळा, रानात सादच वाढली)

माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली

थोबाड माझे एव्हढे का आवडे त्यांना मुळी ?
की डांबराने, दृष्ट ती गावात आजच काढली

गाली खळी ती पीकदाणी, पानदानच वाटली
तोंडावरी नक्षी कशी थाटात छानच काढली

तो पूर्वजच का आठवे बघताच माझे थोबडे
'ए मर्कटा' 'मूर्खा' अशी लाडात हाकच मारली

सौंदर्य माझे देखता ते दोन पाय शिवशिवले
प्रेमात माझ्या प्रूष्ठभागी लाथ छानच मारली

त्या नग्न जीभेला किती ती धार त्यांनी लावली
ऊध्दार साऱ्यांचा करत बारात छानच काढली