"अवाहन"
व्यर्थ नका सांडू पाणी।
सांगतसे वर्षाराणी ॥ध्रु॥
उन्नत करण्या तुमचे जीवन।
शिल्लक न ठेविली जंगल वन॥
होईल कसे! पर्यावरण संतुलन॥।
जागा होई खडबडूनी ॥ध्रु॥१॥
नभातून पडे रिमझिम धार।
आडवून त्याला जिरवी धरा॥
दिसेल सुंदर मग वसुंधरा ॥।
सुखी होशील तू जीवनी ॥ध्रु॥२॥
अनंत खोंडे.
५।८।२०१०.