क्रांतीच वादळ

क्रांतीच वादळ

येऊ दे वादळ क्रांतीच पुन्हा या देशात.
नष्ट होऊ दे अहंकार, व्यभीचार त्या वादळात.
जगण्याची एक दिशा मिळेल भरकटलेल्या मनाला.
सुख समाधान मिळेल दुःखी मनाला.
येऊ दे महापुर क्रांतीचा या देशात.
नष्ट होऊ दे दुःख , कष्ट त्या महापुरात.
सुखाची बरसात होऊ दे!
आंनदाचा वर्षाव होऊ दे!
सुख, समाधान लाभू दे!
हे ईश्वरा , भुकेलेल्यांना अन्न मिळू दे!
रस्ता भरकटलेल्या वाटसरुला योग्य मार्ग मिळू दे!
उघड्यावर असलेल्या संसाराला निवारा मिळू दे!
तुझ्यासारखीच आमच्यात पण
एक अलौकीक , विलक्षण शक्ती निर्माण होऊ दे!
अंधारलेल्या लोकांच्या आयुष्यातून अंधार बाहेर पडू दे!
जगणाऱ्याला जगण्याची उमेद मिळू दे!
दुःखी लोकांच्या आयुष्यात सुखाची बरसात होऊ दे!
                               जितेंद्र गावंडे(९९२२४७६२५०)