थेंबा थेंबाने गळणारा काळ
आयुष्य अवघे ओघळून नेतो
आठवणीच त्या आयुष्याच्या
तेवढ्या पाझरायला बाकी देतो
बोटाच्या नखुरड्या सारखं जीवानं
ठसठसत वेदना जागत भोगत
कितीही काढा गळे मोठे पुन्हा
कळकळणारे हि घेऊन जातो
त्यालाही सोस असावं कदाचित
अमरत्व भाळी मिरविण्याचा भारी
तिळा तिळांनी तुटत वेळ काळाशी
अमरत्व वेळेचे तो नित्य पुसत जातो