असं कुणी मिळेल का?
फुलांप्रमाणे दिसणारं
चांदण्याप्रमाणे चमकणांर.
असं कुणी मिळेल का?
जीवनातील दुःख संपवू शकणारं.
आयुष्यातील अंधार दुर करू शकणारं.
खरच असं कुणी मिळेल का?
आईप्रमाणे माया करणारं.
वडिलांप्रमाणे प्रेम करणारं.
असं कुणी मिळेल का?
थकलेल्यानां विसावा देणारं.
तहानलेल्यांना पाणी पाजणारं.
हरविलेल्या व्यक्तीला शोधून देणारं.
गरीबांना मदत करणारं.
खरच असं कुणी मिळेल का....?
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)