मी एकटाच
समुद्रातील आशेच्या पाण्यावर पोहणारा
असा मी एकटाच आहे.
जीवनात हरलो म्हणून रडत बसनारा
असा मी एकटाच आहे.
जगाला स्वःताच्या मुठीत घेणारा
असा मी एकटाच आहे.
जगाच्या तावडीतून मुक्त झालेला वेडा
असा मी एकटाच आहे.
मन विखरलय माझं या जीवनान.
हसुनसुद्धा हसता नाही येतं मला मनानं.
अंधाऱ्याला प्रकाशाचा मार्ग दाखविनारा
असा मी एकटाच आहे.
आयुष्याच समिकरणं मी समजलो.
तरीसुद्धा आयुष्याच कोडं न सोडवू शकणारा
असा मी एकटाच आहे.
देशाला प्रगतीच्या वाटेवर नेणारा
तरुण असा मी एकटाच आहे.
आयुष्यातील दुःखाला मित्र मानून
प्रेम करणारा प्रेमवीर असा मी एकटाच आहे.
माझ्यात जिद्ध जग बदलण्याची
इतीहास घडवीण्याची. जगावर प्रेम करण्याची.
जगाला जिंकण्याची महत्त्वाकांशा असणारा
सिंकदर असा मी एकटाच आहे.
जितेंद्र गावंडे(९९२२४७६२५०)