अपंग

अपंग

आयुष्याच्या वाटेवरती
कुणीतरी हरवलय मला.

सर्व काही असतांना या समाजाने
अपंग बनवलय मला.

मी अपंग म्हणून
या जगानं , समाजानं  फसविल मला.

आता कसं जगू जीवन या समाजाशीवाय.
कुणीतरी सांगेल का मला.

डोळ्यांनी दिसत असतानांसुद्धा
या जगाने आंधळ बनवलय मला.

खऱ्याच खोट करून या समाजानं
आरोपीच्या पिंजऱ्यात उंभ केलय मला.

गुन्हा माझा इतकाच की
मी अन्यायाविरुद्ध लढत राहीलो.

मोडलो पण वाकलो नाही.
सरल मानेने जगत रहीलो.

जगता जगता या जगाने
स्वःतच्या स्वार्थासाठी झुंजवल मला.
सर्व काही असतानां या
समाजाने अपंग बनवल मला.

                         जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)