मनात इच्छा असावी.......

मनात इच्छा असावी.......

मनात इच्छा असावी जगण्याची.
काहीतरी जगावेगळ करण्याची.
आकाशाला गवसनी घालण्याची.
सागराच्या लाटेवर स्वार होण्याची.

मनात इच्छा असावी सुखाची.
अनंत दुःख सहन करणाऱ्या नदीची.
काटेरी वळनावरून चालण्याची.
दुसऱ्याच्या मदतीला साद देण्याची.

मनात इच्छा असावी प्रेम करण्याची.
रोज एक गुलाब आनून देणाऱ्या प्रेमविरासारखी.
तीची हो न म्हणण्याची वाट
बघण्यापेक्षा प्रेम करण्याची.

प्रेमाला सर्वस्व मानण्याची.
प्रंसगी प्रेमासाठी त्याग करण्याची.

मनात इच्छा असावी जग घडवण्याची.
जगातील अहिंसक प्रव्रुत्तीना संपविण्याची.
स्वःत फुल बनून इतरांना
सुगंघ देणाऱ्या गुलाबासारखी.
स्वःत जळून जगाला प्रकाश
देणाऱ्या मेनबत्तीसारखी.

              जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)