सागर
खळखळणाऱ्या नदीच्या प्रवाहाला
शांत करणारा सागर.
बेभान झालेल्या नदीला स्वतःमध्ये
सामावून घेणारा सागर.
शुर योद्धांच्या पराक्रमाची कथा
सांगणारा सागर.
असंख्य जलाचरांना
आक्षय देणारा सागर.
प्रंसगी वज्राप्रमाणे कठोर तर
फुलांप्रमाणे नाजुक होणारा सागर.
जलचरांचे रक्षण करणारा सागर.
आयुष्य कसं जगाव प्रंसगी
ते सागंणारा सागर.
खचलेल्याना धीर देणारा सागर.
हरलेल्यानां हिमंत देणारा सागर.
सागर म्हणजे साक्षात म्रुत्यू पण
वि. दा. सावरकरांसारख्या स्वातंत्र्यविरांना
अभयदान देणारा सागर.
जितेंद्र गावंडे(९९२२४७६२५०)