स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!

चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो...
ओंजळ भरून!

महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!

महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!

बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!

चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!

ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!

उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!