पाऊस वेडा
=================
पाऊस वेडा मोर मनाचा
मेघ पाहता हर्षुन जातो..
मेघ बावरा जीव मोराचा
ग्रीष्म लागता आतुर होतो..
थेंब आठव ठेवा मनाचा
अनुरागी हरपून जातो..
मेघ बावरा मोर जिवाचा
नाच नाचरा सागर होतो..
पाऊस वेडा मोर मनाचा
थेंब सरीत शहारून जातो..
प्रीत बावरा पिसारा मोराचा
भिजून चिक चिक होतो..
आनंद फुलोरा मनोरथांचा
वादळ झडीत थिजून जातो..
सर आतुर हर्षित जिवाचा
गहिवर डोळी बोलका होतो..
चिखल भिजल्या स्वप्नांचा
पिसा पिसातून गळून जातो..
वेडा पाऊस मोरा मनीचा
ढग फुटीत भोवरा होतो..
नाच नाचऱ्या फुलेर मनाचा
हुंकार कंठीच राहतो..
उजाड भुंडक्या मनमोराचा
हुंदका पाऊस होतो..
पाऊस वेडा मोर मनाचा
काळ सरींत वाहून जातो..
कावरा बावरा जीव मोराचा
झड लागता कातर होतो..
=================
स्वाती फडणीस...... ०९-०८-२०१०