आधार

आधार

(जीवनात अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्नांची परमेश्वराला आर्त हाक)

तुच सांग परमेश्वरा
आम्ही जीवन कंस जगायचं.

अंथरुंगावरती पडून
मरंण कधी यायचं.

तुच सांग परमेश्वरा
आम्ही दुःख कीती सहन करायचं.

दुःखात आम्हाला आधार कोण द्वायचं.
लोकांनी आम्हाला किती हिनवायच.

दगडाप्रमाणे किती याचना
सहन करायचं.
फुलांप्रमाणे जीवन केव्हा जगायच.

सुखानं आमच्या जीवनाला
स्पर्शून कधी जायच.
तुच सांग परमेश्वरा
आम्हाला मरणं कधी यायचं.

आम्ही मानसिक व्याधीने ग्रस्त म्हणून
जगाने आमच्याकडे पाठ फिरवायच.
तुच सांग परमेश्वरा
तुझ्याविना आम्हाला आधार कोणं द्वायच.
                             जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)